‘देताना असं द्यावं की, उजव्या हातानं दिलं, तर डाव्या हाताला खबर
लागू नये,’ असं आमची आजी म्हणायची. तेव्हा त्यामागचा भाव कळायचा नाही. परंतु
श्रीमद्भगवद्गीतेचा परिचय होत गेला, तसं त्यातलं मर्म उमगत गेलं. गीता दानाचेही
तीन प्रकार सांगते. सात्विक, राजस, तामस. दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ १७.२० ॥ योग्य स्थळ, काळ पाहून कर्तव्यभावनेने दिले
जाते, त्याला सात्विक दान म्हणतात. स्वधर्माचरणाने मिळवलेले सन्मानाने द्यावे.
पेरणी करण्यासाठी चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत आणि वाफसा यांचा एकदम योग जुळून येणे दुर्मिळ असते. त्याप्रमाणे सात्विक दानाला देश, काल, पात्र व द्रव्य यांची प्राप्ती दुर्मिळ असते. सोनं मिळालं, तर रत्न दुर्लभ. मौल्यवान रत्न मिळालं तर सोन्याची टंचाई. दोन्ही मिळाले तर घालावं कोणाला? दिवाळीचा सण असावा, सणाला आपले इष्टमित्र हजर असावेत आणि अशावेळी खर्च करण्यासाठी आपल्याकडे विपुल ऐश्वर्य असावं, याला भाग्य लागतं. तसं देश, काल, पात्र व द्रव्य या गोष्टींचा संगम होण्यासाठी दाताही सात्विक असावा लागतो.

![]() |
| daan-kase-dyave |
एकदा दिल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. दात्याच्या मनात उपकारकर्त्याचा भाव असू नये. देणार्याला देण्याचा अहंकार नसावा. घेणार्याच्या मनात लाचारी निर्माण होऊ नये. गरीबांना मदत करून त्याचे रिल बनवून व्हायरल करत असाल, तर तुम्ही त्यांचा आत्मा मारत आहात. दान करा, विसरून जा. माऊली म्हणतात, अशा प्रकारे जे दिले जाते, ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय. ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया । तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ॥ ज्ञा.१७.२८३ ॥
रमेश वाघ, नाशिक- ९९२१८१६१८३

0 टिप्पण्या